रात्रीस खेळ चाले! कर्जतमधील त्या घराचे गूढ समोर, पोलिसांनाही विश्वास बसेना, पाहा फोटो

कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ताडवाडी येथे एक मोठे एमडी ड्रग्ज बनवण्याचे कारखाने उध्वस्त केले आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांना माहिती दिली.

| Updated on: Aug 12, 2025 | 4:33 PM
1 / 8
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नेरळ पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या एका कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी येथील एका निर्जन घरात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे.

2 / 8
सोमवार १० ऑगस्टच्या मध्यरात्री ताडवाडी गावातील काही ग्रामस्थांना एका निर्जन घराबाहेर संशयास्पद हालचाली दिसल्या. एका मारुती ब्रेझा कारमधून काही तरुण रात्रीच्या वेळी डोक्यावरून खोकी वाहून नेत होते. ही गाडी गावापासून काही अंतरावर उभी होती. तसेच एक रुग्णवाहिकाही शेताजवळ ठेवलेली होती.

3 / 8
या संशयास्पद हालचालींमुळे काही तरुणांनी त्या घराला घेराव घातला. आतमध्ये पाहिल्यावर त्यांना पाच तरुण विविध रंगांची रसायने वापरून काहीतरी तयार करताना दिसले. ही रसायने एका विशिष्ट चबुतऱ्यावर ठेवून इलेक्ट्रिक हीटरच्या साहाय्याने उकळली जात होती. त्यातून उग्र वास येत होता.

4 / 8
यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ कळंब आणि नेरळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाचही तरुणांना ताब्यात घेतले.

5 / 8
पोलिसांनी आल्याचे पाहून काही तरुणांनी रसायने जमिनीवर ओतली, तर काहींनी त्यांचे मोबाईल फोन फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही मोबाईल आणि घटनास्थळी सापडलेली रसायने ताब्यात घेतली आहेत.

6 / 8
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या आणि सिमेंटच्या गोणीत भरलेली रसायने आढळली. ही सर्व सामग्री पाहून हा ड्रग्ज बनवण्याचाच प्रकार असल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब टीमला पाठवण्यात आले आहे.

7 / 8
अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी एक तरुण डी-फार्मसी झालेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे तो या ड्रग्ज निर्मितीमध्ये सक्रिय असल्याची शक्यता आहे. सध्या नेरळ पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती देण्यास टाळले असले तरी, घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून हे एमडी ड्रग्ज बनवण्याचेच केंद्र असल्याचे स्पष्ट होत आहे.

8 / 8
विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी याच परिसरातील एका फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी धाड टाकून २२ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईमुळे कर्जत परिसरात अशा ड्रग्ज निर्मितीचे जाळे सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.