
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमीच चर्चेत असणार अभिनेता आहे. कार्तिक आर्यन याचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अभिनेता दिसतोय.

नुकताच कार्तिक आर्यन याने सोशल मीडियावर एक सेशनचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या सेशनमध्ये कार्तिक आर्यन हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना देखील दिसलाय.

कार्तिक आर्यन याला एका चाहत्याने विचारले की, तुम्हाला कधी खरे प्रेम मिळाले आहे का? या प्रश्नावर मजेदार पध्दतीने उत्तर देत कार्तिक आर्यन याने अत्यंत मोठा खुलासा केला आहे, जे ऐकून चाहतेही हैराण झाले.

कार्तिक आर्यन म्हणाला की, मला वाटत होते की, मला खरे प्रेम मिळाले. मात्र, प्रेमाच्या प्रकरणात मी तेवढा जास्त लकी नक्कीच नाहीये. म्हणजे इशाऱ्या इशाऱ्यामध्ये कार्तिक आर्यन याने सांगितले की, आपल्याला खरे प्रेम मिळाले नाहीये.

या सेशनमध्ये चाहते हे कार्तिक आर्यन याला मोठ्या प्रमाणात त्याच्या प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल प्रश्न विचारताना दिसले. काही दिवसांपूर्वीच कार्तिक आणि सारा यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होत्या.