केदारनाथ यात्रेला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! तासांचा प्रवास काही मिनिटांत, पाहा नेमका कसा?

| Updated on: Apr 02, 2023 | 12:30 AM

केदारनाथ हे प्रत्येकाच्या आवडीचं ठिकाण आहे. केदारनाथला जायचं म्हटलं की प्रत्येकजण तयार असतो. मग आपलं काम सोडूनही लोक अगदी आवर्जून केदारनाथला जातात. तर आता अशाच केदारनाथला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

1 / 5
केदारनाथ हे प्रत्येकाच्या आवडीचं ठिकाण आहे. केदारनाथला जायचं म्हटलं की प्रत्येकजण तयार असतो. मग आपलं काम सोडूनही लोक अगदी आवर्जून केदारनाथला जातात. तर आता अशाच केदारनाथला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच भाविकांना हेलिकॉप्टरने केदारनाथची यात्रा करता येणार आहे. IRCTC लवकरच याची बुकिंग प्रक्रिया सुरू करणार आहे.

2 / 5
केदारनाथला जाण्यासाठी ही सेवा 25 एप्रिलपासून सुरू होणार आहे. म्हणजेच या दिवसापासून भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. प्रवासी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचं बुकिंग करू शकतील.

3 / 5
या हेलिकॉप्टर सेवेची चाचणी शुक्रवारी म्हणजेच 31 मार्चपर्यंत होणार आहे. त्यानंतर 1 एप्रिलपासून भाविकांसाठी हेलिकॉप्टरचे बुकिंग सुरू होईल.

4 / 5
गेल्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात DGCA ने केदारनाथच्या दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबत परिपत्रक जारी केले होते. तसंच डीजीसीएकडून परिपत्रक जारी करताना  जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.

5 / 5
IRTC ने भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केला आहे. हा करार 5 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.