मुंबईच्या निसर्गरम्य मलबार हिल नेचर ट्रेलला भेट देण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मुंबई म्हटलं की सतत गर्दी, धक्काबुक्की, धावपळ, गोंधळ हेच चित्र लोकांसमोर उभं राहतं. परंतु याच मुंबईत आता अत्यंत आकर्षक असं नेचर ट्रेल बांधण्यात आलं आहे. इथल्या निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला शांतीची अनुभूती होईल. गुढीपाडव्यानिमित्त या ट्रेलचं लोकार्पण पार पडलं.

| Updated on: Apr 08, 2025 | 1:24 PM
1 / 6
मुंबईतील मलबार हिल इथला बहुचर्चित असा निसर्ग उन्नत मार्ग (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) हा सध्या अनेकांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे. आतापर्यंत तुम्ही या नेचर ट्रेलरचे विविध रील्स आणि व्हिडीओ पाहिलेच असतील. हे रील्स पाहून तिथे भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यापूर्वी या काही खास गोष्टी लक्षात ठेवा..

2 / 6
या एलिव्हेटेड नेचर ट्रेलची लांबी एकूण 485 मीटर आणि रुंदी 2.4 मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी 'सी व्ह्युईंग डेक' देखील बांधण्यात आला आहे.

3 / 6
पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी याठिकाणी प्रवेश नियंत्रण प्रणाली (एक्सेस कंट्रोल सिस्टिम) विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाइन स्लॉटची बुकिंग करावी लागेल.

4 / 6
https://naturetrail.mcgm.gov.in/  या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा स्लॉट बुक करू शकता. इथं भेट देण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी 9 वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आहे. संध्याकाळच्या सौम्य रोषणाईत हा नेचर ट्रेल आणखीनच सुंदर दिसतो.

5 / 6
ऑनलाइन बुकिंगद्वारे या मार्गावर एका वेळी फक्त 200 जणांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीची किंवा आवडीची वेळ निवडायची असेल तर किमान आठ ते दहा दिवस आधी स्लॉट बुक करावा लागेल.

6 / 6
ऑनलाइन स्लॉट बुक केल्यानंतर तुम्हाला तिकीटावर एक बारकोड मिळेल. या बारकोडद्वारे नेचर ट्रेलमधील प्रवेश आणि बाहेर पडणं नियंत्रित केलं जातं. इथे भारतीय पर्यटकांकडून 25 रुपये शुल्क आणि परदेशी नागरिकांकडून 100 रुपये शुल्क आकारला जात आहे.