आईच्या हाताला डायरी लागली, BF बाबतच्या गोष्टी वाचल्या अन्… अभिनेत्रीचा खासगी आयुष्याबाबत केला मोठा खुलासा
दाक्षिणात्या सुपरस्टार अभिनेत्री म्हणून किर्ती सुरेश ओळखली जाते. तिने आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. पण तिच्या खासगी आयुष्याची देखील तेवढीच चर्चा पाहायला मिळते.

दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगमी सिनेमांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश तिच्या अभिनय कारकीर्दीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ती लवकरच ‘रफ्तार’ या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे.
अलीकडेच एका मुलाखतीमध्ये कीर्तीने तिच्या पती अँटोनी थट्टिलसोबतच्या १७ वर्षांच्या नात्याबद्दल खुलेपणाने गप्पा मारल्या. ‘कर्ली टेल्स’शी झालेल्या संभाषणात तिने सांगितले की, सुमारे १५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी लग्न केले. हा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता.
कीर्ती पुढे म्हणाली, “मी खूप पूर्वीपासून अँटोनीला डेट करत होते. कॉलेजमध्ये असताना माझ्या आईने माझी डायरी वाचली, ज्यात आमच्या नात्याबद्दल सगळं लिहिलेलं होतं. डायरी पाहिल्यानंतर तिने फक्त इतकंच म्हटलं, ‘मी तुझी आई आहे, मला तुझी डायरी वाचण्याचा अधिकार आहे.’"
पुढे ती म्हणाली की, "त्यानंतर मी डायरी लिहिणे पूर्णपणे सोडून दिलं. मला लिहायला खूप आवडायचं, पण आता ती डायरी कुठे आहे हेही मला माहीत नाही. मला वाटतं ती पुन्हा मिळावी, पण कदाचित माझ्या आईने ती जाळून टाकली असेल.”
कीर्तीने १२ वी पास झाल्यानंतर अँटोनीला डेट करायला सुरुवात केली. अँटोनी ख्रिश्चन धर्माचा आहे, तर कीर्ती हिंदू कुटुंबातील आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला. फक्त तिचेच नव्हे, तर अँटोनीचे कुटुंबही सुरुवातीला या नात्याच्या बाजूने नव्हते.