
मनोरंजन विश्वातील प्रसिध्द जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.

या दोघांसाठी सिनेविश्वातील त्यांच्या सहकलाकार, मित्र-मंडळींकडून खास केळवणाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

आता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीनं एका खास केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'काल पहिल्यांदा गोरेगाव ईस्ट मध्ये south बघायला मिळालं. ' असं कॅप्शन देत सिद्धार्थनं केळवणाचे खास फोटो शेअर केले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे या केळवणासाठी सिद्धार्थ आणि मिताली त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत खास साऊथ स्टाईलमध्ये तयार झाले होते. या स्पेशल केळवणाचे फोटो सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहेत.