
नुकताच बिग बॉस फेम खानजादी अर्थात फिरोजा खान हिने गंभीर आरोप केलाय. आता तिच्या या आरोपाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

खानजादी सध्या मुंबईमध्ये घर शोधतंय. घरासाठी मुंबईमध्ये भटकताना खानजादी दिसतंय. बिग बाॅसनंतर खानजादी गायब झाली होती.

आता नुकताच खानजादी स्पॉट झाली असून तिने पापाराझी यांच्यासमोर मोठा खुलासा केलाय. खानजादी म्हणाली की, माझे आडनाव खान असल्याने मुंबईमध्ये मला कोणी घर देत नाहीये.

लोक तोंडावर म्हणतात की, मुस्लीम लोकांना आम्ही घर देत नाहीत. इथे माझे कुटुंबिय माझ्यासोबत नसणार आहेत. मला एकटीलाच राहायचे आहे.

मला सुरक्षित वाटायला हवे. त्यासाठी मी त्या पद्धतीचे घर शोधत असल्याचे खानजादी हिने म्हटले आहे. मात्र, अजूनही खानजादी हिला घर मिळाले नाहीये.