
खुशी कपूर अलीकडेच तिच्या इन्स्टा पोस्टमुळे चर्चेत आली होती, ज्यामध्ये ती एका माणसाला मिठी मारताना दिसत आहे. काहींनी इब्राहिम अली खान तर काहींनी वेदांग रैना यांची नावे घेतली, तर काहींना वेगळेच अंदाज लावले होते.

खुशी कपूरने तो फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'तो सत्यापर्यंत पोहोचला आहे, लवकरच तो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल,' त्यामुळे चाहते आणि मीडियामध्ये अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.

फोटोमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्याने ही व्यक्ती कोण असावी याचा अंदाज अनेक चाहते लावत आहेत. इब्राहिम अली खान असू शकतो, असं म्हटलं आहे

अनेक युजर्सनी कमेंटमध्ये वेदांग रैना असू शकतो असही म्हटलं आहे

एका युजरने कमेटं केली आहे की खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान यांचा 'नादानियां' हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल, त्यामुळे हा एक चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असू शकतो असही म्हणत आहेत.

तर एका यूजरने एक मजेदार कमेंट केली आहे ज्यामध्ये असं म्हटलं आहे "खुशी कपूर आणि जान्हवी कपूर हुडी घालून एकमेकांना मिठी मारत आहेत"

खुशी कपूर सध्या तिच्या आगामी 'लव्हयापा' चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो तमिळ चित्रपट 'लव्ह टुडे'चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील मोठा प्रोजेक्ट मानला जातो.

'लवयापा'मध्ये खुशी कपूर महिला मुख्य भूमिकेत आहे, तर जुनैद खान पुरुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अद्वैत चौहान दिग्दर्शित करत असून हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे आता खरोखरच हा खुशीच्या स्वप्नांचा राजकुमार आहे की कोणत्या चित्रपटाचे प्रमोशन याचा उलगडा कधी होतोय याची चाहते वाट पाहतायत

खुशी कपूरच्या या पोस्ट्स आणि चित्रपटांमुळे, तिचे वैयक्तिक आयुष्य आणि फिल्मी जीवन दोन्ही चर्चेत आहेत, जे तिच्यासाठी बॉलीवूडमध्ये आपली छाप पाडण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.