
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) हिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी किआरा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता देखील किआरा हिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'आज रात्री मला गुलाबी वाटत आहे...' असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

किआराच्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. अशात किआराचा पती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहे. पत्नीच्या फोटोंवर अभिनेता म्हणाला, 'मला पण गुलाबी रंगाने रंगव...' सध्या अभिनेत्रीची पोस्ट चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे.

सिद्धार्थ आणि किआरा यांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केलं.लग्नानंतर सर्वत्र सिद्धार्थ - किआरा यांच्या फोटोंची चर्चा होती. सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'शेरशहा' सिनेमातून झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात.