
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी आपल्या करिअरची सुरूवात ही बालकलाकार म्हणून केली. अत्यंत मोठा काळ त्यांनी सिनेसृष्टीत गाजवला आहे. 250 बाॅलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी सुलोचना दीदी यांचे लग्न झाले. सुलोचना दीदी यांना एक मुलगी देखील आहे. राजेश खन्ना यांच्यासोबत सुलोचना दीदी यांनी अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत

जीवन साथी, पतंग, साथ अशा चित्रपटांमध्ये सुलोचना दीदी मुख्य भूमिकेत होत्या. सुलोचना दीदी यांच्या मुलीचे नाव कांचन आहे. कांचन हिने प्रसिद्ध मराठी अभिनेते काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत लग्न केले.

सुलोचना दीदी यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गाैरवण्यात आले. वयाच्या 14 व्या वर्षी लग्न ते बाॅलिवूड चित्रपटांमधील प्रवास हा सुलोचना दीदी यांचा खूप जास्त वेगळा होता.

वयाच्या 94 व्या वर्षी सुलोचना दीदी यांनी शेवटा श्वास घेतला. मुंबईतील रूग्नालयात सुलोचना दीदी यांच्यावर उपचार सुरू होते. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक बाॅलिवूड अभिनेत्यांसोबत काम केले आहे.