
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक शब्दाला मोठी किंमत असते. त्यांच्या एका इशाऱ्याने जगात काहीही घडू शकतं. ते अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे प्रमुख आहेत. सोबतच ते एक यशस्वी उद्योजकही आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च्या बळावर आजघडाली अब्जो रुपयांचं साम्राज्य उभं केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 18 वर्षांची एक नात आहे. तिचं नाव किया ट्रम्प असं आहे. अवघ्या अठरा वर्षांची असली तरी ती आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

काई ट्रम्प सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. टिकटॉवरदेखील तिला लक्षावधी लोकांनी फॉलो केलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पॉन्सरशीप, जाहिरातीच्या जोरावर ती एका वर्षाला साधारण 2.5 दशलक्ष डॉलर्स कमवते.

2025 सालापर्यंत काई ट्रम्प हिची एकूण संपत्ती 21 दशलक्ष डॉलर्स आहे, असे म्हटले जाते. काई ट्रम्प हिला गोल्फ हा खेळ खूप आवडतो. सोशल मीडियावर ती हा खेळ खेळतानाचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते.

काई ही डोनाल्ड ट्रम्प ज्यूनिअर आणि त्यांची कधीकाळी पत्नी राहिलेल्या व्हनेसा ट्रम्प यांची यांची मुलगी आहे. तिचा फॅशन सेन्स एकदम मस्त आहे. तिच्या कपड्यांची नेहमीच चर्चा होते.