
सापाला सगळेच घाबरतात. पण मुंगूस मात्र सापाला घाबरत नाही. त्यामुळे मुंगूस हा एकमेव असा प्राणी आहे, जो सापाशी दोन हात करून त्याला मारून टाकतो, असे म्हटले जाते.

मात्र या जगात सापाशी लढणारा मुंगूस हा फक्त एकमेव प्राणी नाही. असे इतरही काही प्राणी आहेत, जे सापाचा फडशा पाडतात. हे प्राणी कोणते आहेत ते जाणून घेऊ या..

आफ्रिकेत आढळणार हॉनी बेजर हा प्राणी सापाचा शत्रू आहे. या प्राण्याची त्वचा जाड असते. त्यामुळे सापाने दंश केला तरी त्याला काहीही होत नाही. साप दिसताच हा प्राणी थेट हल्ला करतो. त्यामुळे याला सापाचा शत्रू मानले जाते.

सेक्रेटरी बर्ड हा आफ्रिकेतील एक पक्षी आहे. हा पक्षी साप दिसताच त्याची शिकार करतो. त्याचे पाय मजबूत असतात. तो आपल्या पायाच्या पंजाने सापाला चिरडून टाकतो. सापाने दंश केला तरी त्याचा या पक्षावर परिणाम होत नाही. त्यामुळेच हा पक्षी सापांना खाऊन टाकतो..

स्नेक इगल म्हणजेच गरूड हा देखील सापांची शिकार करतो. आकाशात उंच भरारी घेऊन स्नेक इगल सापांचा शोध घेता. साप दिसताच तो त्याच्यावर तुटून पडतो. सापाच्या विषाने या गरुडाला काहीही होत नाही. त्यामुळेच हा पक्षी सापाची शिकार करू शकतो.

किंग स्नेक ही सापाची एक प्रजाती आहे. हा साप अन्य सापांना खाऊन टाकतो. किंग स्नेक हा बिनविषारी साप आहे. पण तो विषारी सापांनाही खाऊन टाकतो. सापांच्या विषाने त्याला काहीही होत नाही. सापांना पकडून त्यांची शिकार करण्यात सा साप तरबेज असतो. मिरकॅट नावाचा सस्तन प्राणी सांपाची शिकार करण्यात तरबेज असतो. हा प्राणी सापांची समूहाने शिकार करतो. विशेष म्हणजे तो कोब्रासारख्या अतिविषारी सापांचीही शिकार करण्यास सक्षम आहे.