Raw Mango Benefits : आंबट, गोड, झक्कास… तोंडाला पाणी आणणारी कैरी आरोग्यासाठीही प्रचंड फायदेशीर

उन्हाळा कितीही तापदायक असला तरी तो सुसह्य करायला लावणारी एकच गोष्ट, ती म्हणजे आंबा. आंबा हे बहुतांश लोकांच्या आवडत्या फळांपैकी एक असतो. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा त्याच्या गोड आणि रसाळ चवीसाठी प्रसिद्ध आहे. पण बऱ्याच लोंकान कच्चा आंबा, अर्थात कैरी खायलाही बरीच आवडते. कैरीचं पन्हं, कैरीचा छुंदा, किंवा लोणचं तर केलं जातंच पण काही जण तिखट-मीठ लावून नुसत्याच कैरीच्या फोडीही खातात. हीच कैरी आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते.

| Updated on: May 17, 2026 | 3:41 PM
1 / 6
अनेकांना कैरी आवडतेच.  आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, के, सी आणि बी 6 मोठ्या प्रमाणात असतात. तसेच, त्यामध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त हे घटकही भरपूर प्रमाणात असतात.

अनेकांना कैरी आवडतेच. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, के, सी आणि बी 6 मोठ्या प्रमाणात असतात. तसेच, त्यामध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त हे घटकही भरपूर प्रमाणात असतात.

2 / 6

तज्ञांच्या सांगण्यानुसार, कैरीमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असेत. कैरीचे सेव केल्यास बद्धकोष्ठता टाळता येते.

3 / 6

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, झिंक, लोह आणि व्हिटॅमिन ई यांसारखी पोषक तत्वं कैरीमध्ये असतात, ही तत्वं आपल्या केसांचं आणि त्वचेचं पोषण करतात. व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीस मदत करते, तर लोह आणि झिंकमुळे आपले केस खूप मजबूत होतात.

4 / 6

कैरी खाणं फायदेशीर असतं. कैरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, फायबर आणि पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

5 / 6

कैरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेत अचानक वाढ होत नाही. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते मधुमेही रुग्णांसाठीही उपयुक्त आहे.

6 / 6

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us