
तुम्ही ज्या पोझिशन्समध्ये झोपता त्यावरून तुम्ही कोण आहात आणि तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे याबद्दल बरेच काही कळू शकते,हे तुम्हाला माहीत आहे का ? हे कितीही आश्चर्यकारक वाटलं तरी खरं आहे. आपण ज्या स्थितीत झोपतो त्यावरून आपण कोण आहोत, आपला स्वभाव आणि आपले व्यक्तिमत्व याबद्दल माहिती मिळते, आपली पर्सनॅलिटी कळते. बरेच लोक यावर विश्वास ठेवतात. तुम्ही कोणत्या पोझिशन्समध्ये झोपता ते पहा आणि त्यावरून तुमची पर्सनॅलिटी कशी हे जाणून घेऊ शकता.

हलकी झोप घेणारे : हलकी झोप घेणारे लोक आशावादी असतात. ते लवकर उठतात. ते दिवसभर सक्रिय असतात. त्यांचा स्वतःवर खूप विश्वास असतो. शिवाय, ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप परिश्रमपूर्वक आणि चिकाटीने काम करतात. ते त्यांचे जीवन रचनात्मकपणे जगतात. त्यांचा दृष्टिकोन व्यापक असतो. असे लोकं हे मैत्रीला अधिक महत्त्व देतात. त्यासोबतच ते इतरांचं बोलणं देखील लक्षपूर्वक ऐकतात. त्यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

एका कुशीवर झोपणारे लोक : डावीकडे असो वा उजवीकडे, एका कुशीवर झोपणारे लोक शांत असतात. ते खूप विश्वासार्ह असतात. ते सर्व बाबतीत सक्रिय असतात. शिवाय, ते भूतकाळाची काळजी करत नाहीत. ते नेहमीच भविष्याचा विचार करत असतात. आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीनुसार ते स्वतःमध्ये नीट बदल करतात. कठीण काळातही ते हसऱ्या चेहऱ्याने वावरताना दिसतात.

पाय पोटाशी घेऊन झोपणं : जर तुम्हाला लहान मुलांसारखी, म्हणजेच हात आणि पाय पोटाजवळ घेऊन झोपण्याची सवय असेल तर तुम्ही खूप अंतर्मुखी आहात. शिवाय, असे झोपणारे लोक खूप संवेदनशील असतात. ते कोणाबद्दल जास्त विचार करत नाहीत. अशा लोकांना नेहमीच सुरक्षित राहायचं असते. नवीन ठिकाणी गेल्यावर त्यांना थोडा संकोच वाटतो. त्यांना चित्रकला, लेखन, नृत्य इत्यादींमध्ये जास्त रस असतो.

पोटावर झोपणे: पोटावर झोपणारे लोक नेहमीच आनंदी आणि शांत असतात. त्यांचा दृष्टिकोन व्यापक असतो. त्यांना अधिक सामाजिक राहणे देखील आवडते. अशी लोकं अधिक स्वतंत्र असतात आणि जीवनात कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास कचरत नाही, आव्हांनाचा ते धीटपणे सामना करतात.

हात पसरून झोपणारे लोक : असे झोपणारे लोक इतरांशी खूप मोकळेपणाने वागतात. पण ते इतरांवर लवकर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना इतरांवर विश्वास ठेवण्यास बराच वेळ लागतो. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवल्यानंतरच ते त्यांच्याबद्दल निर्णय घेतात.