Tips and Tricks : iPhone असो की सॅमसंग, लॅपटॉपवरून कधीच चार्ज करू नका मोबाईल; 99% लोकांना जे माहीत नाही ते समजून घ्या

ऑफिसमध्ये काम करताना किंवा प्रवास करताना, आपण आपले फोन लॅपटॉपवरून चार्ज करतो, परंतु लॅपटॉपवरून फोन चार्ज करणे किती धोकादायक असू शकते हे तुम्हाला माहिती नाही.

| Updated on: Sep 05, 2025 | 2:53 PM
1 / 8
आजकाल आपल्या मोबाईलशिवाय, स्मार्टफोनशिवाय एक दिवसही घालवणे कठीण वाटते. बरेच लोक  वैयक्तिक तसेच व्यावसायिक कामांपर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या मोबाईल फोनवर करतात. पण जेव्हा स्मार्टफोनची बॅटरी कमी होऊ लागते तेव्हा तो फोन पटकन चार्ज व्हावा अशी इच्छा असते.  कधी चार्जिंग पॉईंट नसेल, किंवा दूर असेल तर काहीजण लॅपटॉपरूनच मोबाईल चार्ज करतात. आपल्या सोयीसाठी लॅपटॉपवरून मोबाईल चार्ज करण्याची सवय अनेकांना लागली असेल. विशेषतः, ऑफिसमध्ये काम करताना किंवा प्रवास करताना, काही लोकं लॅपटॉपवरून फोन चार्ज करतो, परंतु लॅपटॉपवरून फोन चार्ज करणे किती धोकादायक असू शकते हे आपल्याला माहिती नाही.

2 / 8
 स्मार्टफोन हा नेहमी त्याच्या मूळ चार्जरनेच चार्ज करावा, असा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही तुमचा फोन लॅपटॉपने चार्ज केला तर तुमचा फोन लवकर खराब होऊ शकतो. तसेच त्यामुळे फोनचे खूप नुकसान होतं. मोबाईल किंवा फोन लॅपटॉपने का चार्ज करू नये, ते जाणून घेऊया.

3 / 8
जेव्हा मोबाईल फोन मूळ चार्जरने चार्ज केला जातो तेव्हा चार्जिंगचा वेग जास्त असतो. दुसरीकडे, लॅपटॉपच्या यूएसबी पोर्टने फोनचा चार्जिंगचा वेग कमी होतो. कारण बहुतेक लॅपटॉपचे USB 2.0 पोर्ट फक्त 0.5A (अँपिअर) आणि USB 3.0 पोर्ट 0.9A पॉवर देतात. दुसरीकडे, फोन चार्जर 2A किंवा त्याहून अधिक पॉवर देतात. ज्यामुळे फोन जलद चार्ज होतो.

4 / 8
बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम : कमी व्होल्टेज आणि वीजपुरवठा फोनच्या बॅटरीवर परिणाम करतो. अशा वेळी तुम्ही जर लॅपटॉप किंवा अनियमित वीजपुरवठा करणाऱ्या उपकरणावरून फोन बराच वेळ चार्ज करत राहिलात, तर त्याचा तुमच्या मोबाइल फोनच्या बॅटरीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता आणि आयुष्यमान कमी होऊ शकते. परिणाम फोनवरही होतोच ना...

5 / 8
ओव्हरहिटींग अर्थात फोन जास्त गरम होणं : लॅपटॉपवरून फोन हळूहळू चार्ज होतो. त्यामुळे मोबाईल बराच वेळ  लॅपटॉपशी जोडलेला ठेवतो. असे केल्याने फोन गरम होऊ लागतो. कधीकधी फोन गरम होऊ लागतो, ज्यामुळे बॅटरीवर परिणाम होतो आणि त्याचे नुकसान देखील होऊ शकते.

6 / 8
लॅपटॉप बॅटरीवर परिणाम : जर तुमचा लॅपटॉप बॅटरीवर चालत असेल आणि तुम्ही त्यावरून तुमचा फोन चार्ज करत असाल तर त्याची बॅटरी देखील लवकर डिस्चार्ज होऊ लागेल. इतकेच नाही तर त्यामुळे लॅपटॉपची बॅटरी लाइफ देखील कमी होऊ शकते.

7 / 8
 डेटा चोरी आणि व्हायरसचा धोका: बऱ्याचदा आपण विचार न करता आपला फोन चार्जिंगसाठी लॅपटॉपशी जोडतो. असे केल्याने, यूएसबी कनेक्शनवरून डेटा ट्रान्सफर देखील सुरू होतो आणि जर तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस किंवा मालवेअर असेल तर ते फोनवर देखील येऊ शकते. तसेच जर तुम्ही तुमचा फोन दुसऱ्याच्या लॅपटॉपला चार्ज करण्यासाठी जोडला तर तुमचा डेटा चोरीला जाण्याचा धोका देखील वाढतो.

8 / 8
शॉर्ट सर्किटचा धोका: लॅपटॉप चार्ज करताना, मोबाईल फोनला जोडणे टाळावे. कारण, दोन्ही उपकरणांची पॉवर हाताळण्याची क्षमता वेगळी आहे. अशा परिस्थितीत, लॅपटॉप किंवा मोबाईल फोनमध्ये शॉर्ट सर्किट देखील होऊ शकते.