
'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी ती लग्न करणार असून या दोघांचा मेहंदी कार्यक्रम पार पडला.

अंकिताने या मेहंदी कार्यक्रमाचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने कुणालबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू काही करू शकत नाहीस... आयुष्यात असं बोलणाऱ्यांच्या गर्दीमध्ये जेव्हा कोणी हे बोलतं.. तू जशी आहेस तशी फार सुंदर आहेस, तू प्रेमळ आहेस आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, तू जशी आहेस तशीच कायम रहा. कारण मी तुझ्या असण्यावर प्रेम करतो. तेव्हा वाटलं आयुष्याला खरा अर्थ आहे,' अशी पोस्ट अंकिताने लिहिली आहे.

'त्याच आयुष्याची पहिली पायरी सोबत चढतोय, आशिर्वाद असु द्या', असंही तिने पुढे म्हटलंय. काही दिवसांपूर्वी अंकिताने तिच्या प्री-वेडिंगचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला.

अंकिताचा होणार पती कुणाल हा संगीत दिग्दर्शक असून 'आनंदवारी' या म्युझिक अल्बमसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. फेब्रुवारी महिन्यातच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.