तुझ्या पप्पाला सोडून देते रे, कुणालच्या घरातच सुरू होता वाद? खवड्या डोंगर प्रकारणात ज्याची भीती तोच ट्विस्ट!
मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात विशाल याच्या वडिलांचाही खाणीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर पती आणि मुलगा पडल्यामुळे कुणालच्या आईनेही उडी घेऊन आपला जीव दिला. या सर्व घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगरावर पडून चांदगुडे कुटंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कुणाल चांदगुडे या तरुणाचे आयफोनच्या हप्त्यांमुळे वडिलांसोबत वाद झाले होते, म्हणूनच तो घरच्यांना भीती दाखवत होता आणि यातूनच ही दुर्घटना घडली, असे सांगितले जात होते.

दरम्यान, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात विशाल याच्या वडिलांचाही खाणीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर पती आणि मुलगा पडल्यामुळे कुणालच्या आईनेही उडी घेऊन आपला जीव दिला. या सर्व घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. दरम्यान, या मृत्यूकांडाबाबत रोज नवनवी माहिती समोर येत आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार चांदगुडे कुटुंबात अंतर्गत कलह होतात. त्याच्या वडिलांचे आणि कुणालचे वाद व्हायचे. कुणालची आई यूट्यूबर होती. त्यांचे यूट्यूबवरील काही व्हिडीओ पाहता त्यांच्या कुटुंबात काहीतरी वाद होता असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान, कुणाल खवड्या डोंगराच्या कड्यावर उभा होता तेव्हाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओंमध्ये कुणालला त्याची आई समजावून सांगताना दिसतेय. काहीही कर पण आत्महत्येचा प्रयत्न करू नको, अशी विनवणी करताना कुणालची आई दिसत आहे.

अशाच एका व्हिडीओमध्ये तुझे आणि तुझ्या वडिलांचे वाद आहेत ना. मी तुझ्या वडिलांना सोडून देते. आपण दोघे आई-लेक राहू, अशी विनवणी कुणालची आई करत असल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसतेय. दरम्यान, कुणालच्या आईने ही विनवणी करताना गळ्यातील मंगळसुत्रदेखील काढून टाकले होते. त्यामुळेच चांदगुडे कुटुंबात नेमका वाद काय होता? असे विचारले जात आहे.