Kushal Badrike: तिने माझी जागा दाखवून दिली..; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडलं?

कॉमेडियन आणि अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर नेहमीच आपल्या विनोदी शैलीतील पोस्टमुळे चर्चेत असतो. यावेळी त्याने आयुष्यातील पसारा आणि तो आवरण्यास मदत करणाऱ्या एका खास व्यक्तीविषयी भन्नाट पोस्ट लिहिली आहे.

| Updated on: Nov 23, 2026 | 1:07 PM
1 / 5
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता कुशल बद्रिके आपल्या विनोदी अभिनयासोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चर्चेत असतो. आपल्या आयुष्यातील गंमतीशीर प्रसंग तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या पोस्टमधून कधी एखादा मजेशीर किस्सा समोर येतो, तर कधी त्याच्या लिखाणातून आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन दिसतो. आता पुन्हा एकदा कुशलची अशीच एक भन्नाट पोस्ट चर्चेत आली आहे.

2 / 5

यावेळी त्याने आपल्या आयुष्यातील पसारा, तो आवरण्याची सवय आणि त्याला मदत करणाऱ्या एका खास व्यक्तीविषयी मजेशीर अंदाजात लिहिलं आहे. कुशलने त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एखादी गोष्ट आवरायची म्हटलं की त्याच्याकडून आधी पसारा होतो. इतकंच नाही, तर ‘पसारा आणि आयुष्य मला दोन्ही आवरता आले नाहीत’, असंही त्याने विनोदी शैलीत लिहिलं आहे.

3 / 5

मात्र, या सगळ्यात एक व्यक्ती त्याच्या मदतीला कायम धावून येते. तिला प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवता येते आणि अनेकदा तिने आपल्याला आपली जागा दाखवून दिली आहे, असं कुशलने म्हटलं आहे. या पोस्टमध्ये कुशलने एका व्यक्तीचा उल्लेख ‘जागेवाला’ असा केला आहे. विशेष म्हणजे, त्याने या व्यक्तीविषयी लिहिताना विनोदाची पेरणी केली आहे.

4 / 5

कार्यक्रमाच्या निमित्ताने तो जर्मनीला निघाला होता. त्यावेळी या जागेवाल्यानेही आपल्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर ‘जागेवाल्याला दुखावून चालत नाही, बाबा!’ असं म्हणत कुशलने मिश्किल टिप्पणी केली आहे. पोस्टच्या शेवटी त्याने आणखी एक भन्नाट तळटीप लिहिली आहे. ‘जागा बदलली म्हणून जागेवाला बदलत नाही’, असं म्हणत त्याने चाहत्यांना हसवलं आहे. या एका वाक्यातून त्याने संपूर्ण पोस्टला मजेशीर शेवट दिला आहे.

5 / 5

कुशलच्या या पोस्टमधील शब्दांची निवड आणि त्याची विनोदी शैली चाहत्यांना भावत आहे. विशेषतः ‘जागेवाला’ हा शब्द त्याने पत्नी सुनयनासाठी वापरला आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us