Kushal Badrike: मला मरताना पाणी पाजू नका आधी माझा… कुशल बद्रिकेने सांगितली शेवटची इच्छा
Kushal Badrike: कॉमेडी अभिनेता कुशल बद्रिकेने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शेवटची इच्छा सांगितली आहे. त्याने सांगितले की त्याला मरताना पाणी पाजायचे नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन जायचं नाही. नेमकं काय करायचं? हे सांगितले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरा पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. त्याच्या कॉमेडीच्या टायमिंगने चाहत्यांच्या मनात अक्षरश: घर केले आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये कुशलने त्याच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. कुशलने थेट त्याची शेवटची इच्छ सांगितली आहे.
काही दिवसांपूर्वी कुशल बद्रिकेचे मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी त्याने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. आता तो नेमकं काय म्हणाला? वाचा...
आरपारला दिलेल्या मुलाखतीत कुशल बद्रिकेने त्याची शेवटची इच्छा सांगितली आहे. विजू माने, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण यांच्याकडे बोट करत कुशल बद्रिके म्हणाला, "त्यांना माहिती आहे त्यांना सांगून ठेवलीये माझी शेवटची इच्छा काय आहे ते."
तेवढ्यात विजू माने म्हणतात की, तो 98 व्या वर्षी वृद्धापकाळाने जाणार आहे. आपल्याला कळलं की हा मरतोय. हा जाणार. त्यावेळेला आपण काय करायचं, याला पाणी पाजायचं का? तर नाही. हॉस्पिटलला न्यायचं का? नाही. डॉक्टर बोलवायचे का? तर नाही. पहिलं काय करायचं, तर याचा मोबाईल घ्यायचा आणि तो फोडायचा. तो जाळायचा, त्याची राख समुद्रात टाकायची, ही याची इच्छा आहे.
कुशल बद्रिकेची शेवटची इच्छा ऐकून अनेकांना हसू आले आहे. पुढे या मुलाखतीत बोलताना कुशल बद्रिके म्हणाला की, "हे सगळं झाल्यावर मग मला वाचवायला या. मग काय ते पाणी वैगरे काय ते. कारण त्याच्यानंतर जर का मी वाचलो तर मी काय वाचत नसतो."