AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : रागाच्या भरात करताय ‘या’ 5 गोष्टी, होईल वाईट परिणाम, तसरी सर्वात महत्त्वाची

Chanakya Niti : अनेकदा आपण रागाच्या भरात समोरच्याला काहीही बोलतो. पण ते फार चुकीचं आहे. अचार्य चाणक्य सांगतात, अशा काही गोष्टी आहेत, ज्या चुकूनही रागात बोलू नये. या शब्दांमुळे नाती खराब होण्याची दाट शक्यता असते. तर जाणून घ्या कोणत्या आहेत 'त्या' गोष्टी...

Chanakya Niti : रागाच्या भरात करताय 'या' 5 गोष्टी, होईल वाईट परिणाम, तसरी सर्वात महत्त्वाची
| Updated on: Nov 22, 2026 | 10:39 AM
Share

Chanakya Niti : राग तर प्रत्येकाला येतो पण, अनेकांना प्रचंड राग येतो, तर काहींना फरा येत नाही, राग करण्यापेक्षा ते शांग राहणं योग्य समजतात. पण काही व्यक्ती रागाच्या भरात खूप काही बोलून जातात. पण रागाच्या भरात काहीही फार मोठी चूक आहे. रागाच्या भरात बोललेल्या या कठोर शब्दांमध्ये एक सुंदर नातेसंबंध उद्ध्वस्त करण्याची शक्ती असते. म्हणूनच, आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की, जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा शांतपणे वागणे आणि मौन बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी असंही सांगितलं आहे की, रागाच्या भरात काही शब्द बोलू नयेत. याबद्दलची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

रागाच्या भरात हे शब्द बोलू नका:

आचार्य चाणक्यांच्या मते, आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि कोणाशीही अनादराने बोलणं टाळलं पाहिजे. घरी असो वा कामाच्या ठिकाणी, रागाच्या भरात कधीही कोणाचा अपमान करू नये. कारण यामुळे एक सुंदर नातेसंबंध बिघडू शकतो. शिवाय, जर तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणाचा अपमान केला, तर त्याचा तुमच्या कामावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून, रागाच्या भरात कोणाशीही कठोर शब्दांनी बोलू नका.

काही लोक, भांडणाच्या वेळी, समोरच्या व्यक्तीच्या भूतकाळातील चुकांबद्दल वारंवार बोलतात. ही छोटीशी चूक म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखी आहे, ज्यामुळे भांडण आणखी चिघळतं. तसेच, या एका चुकीमुळे समोरच्या व्यक्तीला खूप वेदना होण्याची शक्यता असते. म्हणून, रागात असताना असं बोलण्याऐवजी शांत राहणंच उत्तम. यामुळे भांडण शांत होण्यास मदत होईल.

काही लोकांना रागाच्या भरात बोलण्याची सवय असते. ते केवळ रागावलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत नाहीत, तर त्यांच्या कुटुंबालाही भांडणात ओढतात. अशा प्रकारे कोणाच्या आई-वडिलांबद्दल, भावंडांबद्दल किंवा कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल नकारात्मक बोलणं ही एक गंभीर चूक आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला खूप खोलवर दुखापत होऊ शकते. म्हणूनच, आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे, असं देखील चाणक्य सांगतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर असतो. अशा परिस्थितीत, रागाच्या भरात कोणाचीही वैयक्तिक माहिती इतरांना सांगू नये. जर कोणी तुमच्यावर रागावलं, तर त्या रागाच्या भरात त्यांची वैयक्तिक माहिती, चुका, गुपिते इतरांना सांगून त्यांचा अपमान करू नये. यामुळे केवळ त्यांचा तुमच्यावरील विश्वासच तुटत नाही, तर नातेसंबंधही बिघडू शकतात. याशिवाय, समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते, असं चाणक्य म्हणतात.

कधीकधी, क्षुल्लक गोष्टींवरून होणारे वाद विकोपाला जातात. अशा वेळी, बहुतेक लोक असे काही बोलून जातात ज्यामुळे नातेसंबंध संपुष्टात येऊ शकतात. अशा वारंवार होणाऱ्या वक्तव्यांमुळे नात्यातील विश्वास कमी होतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक लहानसहान गोष्टीवरून नाते तोडण्याची किंवा संपवण्याची धमकी देता, तेव्हा असे एक सुंदर नातेसंबंध खराब होण्याची शक्यता असते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले