Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींबाबत मोठी अपडेट! आता 1500 रुपयांऐवजी…,मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

लाडक्या बहिणींनी पुन्हा संताप व्यक्त केला आहे. पात्र असताना अपात्र केल्याने लाडक्या बहिणींनी सरकारकडे नवी मागणी केली आहे. जाणून घ्या नवीन मागणी

| Updated on: Oct 15, 2026 | 2:13 PM
1 / 5
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे. या लाडक्या बहिणींनी किसान सभेच्या नेतृत्वात अकोले तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे. या लाडक्या बहिणींनी किसान सभेच्या नेतृत्वात अकोले तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

2 / 5

पात्र असताना अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहि‍णींनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये गृहिणी, मोलमजुरी, घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.

3 / 5

गृहिणी , मोलमजुरी, घरकाम करणाऱ्या, आदिवासी महिलांचे लाडक्या बहीण योजनेचे अनुदान बंद झाल्याचं वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे या लाडक्या बहि‍णींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

4 / 5

केवायसी प्रकिया पुन्हा सुरू करून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ द्या, अशी मागणी या महिलांनी केली आहे. दिवाळीआधी योजनेचा लाभ मिळावा, तसेच 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करा, अशी मागणी या महिलांनी केली.

5 / 5

अंगणवाडी पोषण आहार शिजवणाऱ्या आशा सेविकांना मानधन देण्याचीही मागणी करण्यात आली. किसान सभेचे डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us