काही केलं तरी गाता येईना; लता मंगेशकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण गाणं ठरलं सुपरहिट, आजही डोळे मिटून ऐकतात लोक
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील ‘लग जा गले’ हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. 1964 मध्ये ‘वो कौन थी’ या चित्रपटासाठी तयार झालेले हे गाणे सुरुवातीला दिग्दर्शक राज खोसला यांनी नाकारले होते. मात्र नंतर याच गाण्याने वेगळी ओळख निर्माण केली.

संगीतकार मदन मोहन यांनी ही धून राज खोसला यांना ऐकवली होती. मात्र पहिल्यांदा ऐकल्यानंतर त्यांनी ती नाकारली. त्यामुळे मदन मोहन निराश झाले.
मदन मोहन यांनी मनोज कुमार यांना ही धून राज खोसला यांना पुन्हा ऐकवण्याची विनंती केली. मनोज कुमार यांनाही धून आवडली होती. त्यांनी दिग्दर्शकांना ती पुन्हा ऐकण्यास तयार केले.
दुसऱ्यांदा धून ऐकल्यानंतर राज खोसला यांना ती अखेर पसंत पडली. या प्रसंगानंतर त्यांनी पहिल्यांदा धून नाकारल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. या घटनेचा उल्लेख मदन मोहन यांच्या अधिकृत वेबसाइटवरील किस्स्यातही आहे.
इतकेच नाही तर या गाण्याची धून म्हणजेच चालीचा गायिका लाता मंगेशकरांनाही त्रास झाला. त्यांच्या सर्वात आवडत्या गाण्यापैंकी एक असलेलं हे गाणं गायनासाठी खूप कठिण असल्याचं त्यांनी स्वतः मान्य केलं आहे. संजीव कोहली यांच्या माहितीनुसार, गाण्यातील सुरांमधील बारीक चढ-उतार गाणे कठीण होते. त्यामुळे रेकॉर्डिंग त्यांच्यासाठीही आव्हानात्मक ठरले.
मदन मोहन यांच्या संगीताला राजा मेहदी अली खान यांच्या शब्दांची साथ मिळाली. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे ‘लग जा गले’ हे गाणे अजरामर झाले. 62 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.