Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीदरम्यान लालबागचा राजा भायखळ्यातील हिंदुस्तानी मशिदीसमोर का थांबवला जातो? 1980 साली…

तब्बल २४ तास चालणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत बाप्पाचा रथ भायखळ्यातील 'हिंदुस्तानी मशिदीसमोर' का थांबवला जातो? मुंबईच्या खऱ्या बंधुत्वाची अन् सामाजिक सलोख्याची ही अनोखी परंपरा आणि काय आहे नेमकी प्रथा नक्की जाणून घ्या आणि सर्वांशी शेअर करा! जेव्हा राजाचा रथ हिंदुस्थान मशिदीजवळ येतो तेव्हा हजारो भाविकांचा गणपती बाप्पा मोरया चा गजर घुमू लागतो. त्याच वेळी मशिदी समितीचे सदस्य आणि स्थानिक मुस्लिम बांधव अत्यंत आदराने मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी बाहेर येतात. मुस्लिम बांधवांकडून राजाच्या मूर्तीवर गुलाबांच्या फुलांची उधळण केली जाते, बाप्पाचे आशीर्वाद घेतले जातात. आणि मिरवणुकीतील भाविकांना प्रेमाने मिठाई वाटली जाते, हि ऐतिहासिक परंपरा १९८० ते १९९० च्या दशकात विसर्जन मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी स्थानिक मुस्लिम नेत्यांनी सुरू केली.

| Updated on: Sep 25, 2026 | 4:46 PM
1 / 5
तब्बल २४ तास चालणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत भायखळ्यातील हिंदुस्तानी मशिदीजवळ बाप्पाचा रथ थांबतो. राजाचा रथ मशिदीजवळ पोहोचताच हजारो भाविकांच्या “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो.

तब्बल २४ तास चालणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत भायखळ्यातील हिंदुस्तानी मशिदीजवळ बाप्पाचा रथ थांबतो. राजाचा रथ मशिदीजवळ पोहोचताच हजारो भाविकांच्या “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो.

2 / 5

मशिदी समितीचे सदस्य आणि स्थानिक मुस्लिम बांधव मिरवणुकीचे आदराने स्वागत करण्यासाठी पुढे येतात. मुस्लिम बांधवांकडून लालबागच्या राजावर गुलाबांच्या फुलांची उधळण करत बाप्पाचे स्वागत केले जाते.

3 / 5

यावेळी मुस्लिम बांधव बाप्पाचे आशीर्वाद घेतात आणि मिरवणुकीतील भाविकांना प्रेमाने मिठाई वाटतात. ही अनोखी परंपरा १९८० ते १९९०च्या दशकात विसर्जन मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी झालेल्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्याचे सांगितले जाते.

4 / 5

स्थानिक मुस्लिम नेत्यांनी लालबागच्या राजा मंडळाला सहकार्य केल्यानंतर निर्माण झालेली ही आपुलकीची परंपरा आजही कायम आहे. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दिसणारा हा क्षण हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो.

5 / 5

मुंबईच्या बंधुत्वाची आणि सर्वधर्मीयांच्या आपुलकीची अनुभूती देणारा हा क्षण प्रत्येक भाविकाच्या मनाला स्पर्शून जातो. मशिदीजवळील स्वागतानंतर ढोल-ताशांच्या गजरात लालबागचा राजा पुढील प्रवास करत गिरगाव चौपाटीकडे रवाना होतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us