
वर्ध्याच्या हमदापुर येथे अंदाजे तीन किलो वजनाची गार कोसळल्याची चर्चा आहे. घराच्या अंगणात बर्फाचा गोळा कोसळल्याची चर्चा संपूर्ण गावात सुरु आहे. गावऱ्यांना देखील आश्चर्य वाटलं आहे.

तीन किलो वजनाच्या बर्फाच्या गोळ्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटो, व्हिडिओत तीन किलो गार पडल्याची चर्चा सुरु आहे.

मात्र बर्फाचा गोळा आकाशातून पडला नसल्याचा आकाश निरीक्षण मंडळाचे विदर्भ अध्यक्ष पंकज वंजारे यांचं पाहणीनंतर सांगितलं आहे. आकाश निरीक्षण मंडळाचे विदर्भ अध्यक्ष म्हणतात बर्फाचा गोळा आकाशातून पडला नाहीय

हमदापूर येथे पडलेला दोन किलोचा बर्फाचा गोळा आकाशातून पडल्याच समज चुकीचा असल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाल्याचे वंजारे यांचे मत आहे. आकाशातून इतका मोठा बर्फाचा गोळा पडला असता तर त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला असता तसेच बर्फाचे तुकडे झाले असते, पण तसे काहीही आढळलेले नाही

त्यामुळे हा बर्फाचा गोळा आकाशातून पडलाच नाही. क्वचित अशा प्रकारे मोठी गार पडते त्याला मेगाक्रायोमीटिअर म्हणतात परंतु त्याला पोषक भौगोलिक परिस्थिती त्या वेळी जिल्ह्यात नव्हती असा निष्कर्ष तपासणीत पुढे आल्याचे पंकज वंजारे यांनी सांगितलं आहे.