लता मंगेशकरांनी वयाच्या 13 व्या वर्षी गायलेलं पहिलं मराठी गाणं; कधीच झालं नाही प्रदर्शित, कारण…

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. लहान वयातच वडिलांकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. 13 व्या वर्षी त्यांच्या व्यावसायिक गायन कारकिर्दीला सुरुवात झाली. आज लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुरेल प्रवासाविषयी जाणून घ्या.

| Updated on: Sep 28, 2026 | 7:42 PM
1 / 5
संगीताचे संस्कार   लता मंगेशकर यांनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिकले.1942 मध्ये वडिलांचे निधन झाले, तेव्हा त्या केवळ 13 वर्षांच्या होत्या.   यानंतर मास्टर विनायक यांनी त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाची मदत केली.

संगीताचे संस्कार लता मंगेशकर यांनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिकले.1942 मध्ये वडिलांचे निधन झाले, तेव्हा त्या केवळ 13 वर्षांच्या होत्या. यानंतर मास्टर विनायक यांनी त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाची मदत केली.

2 / 5

पहिलं रेकॉर्ड केलेलं गाणं 1942 मध्ये त्यांनी 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड केले. नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे गाणे नंतर चित्रपटातून हटवण्यात आले. पहिली मंगळागौर'मधील 'नटली चैत्राची नवलई' हे त्यांचे पहिले रिलीज झालेले गाणे ठरले.

3 / 5

संगीताची मोठी कारकीर्द लता मंगेशकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 36 पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गायली. त्यांच्या आवाजामुळे भारतीय संगीतविश्वात त्यांना 'स्वर कोकिळा' म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांवर आपली खास छाप सोडली.

4 / 5

स्टुडिओला मंदिर मानायच्या लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये जाताना बाहेर चप्पल काढायच्या. त्या स्टुडिओला मंदिरासारखे पवित्र स्थान मानत असल्याचे सांगितले जाते. परफेक्शन असूनही त्या रिलीज झाल्यानंतर स्वतःची गाणी सहसा ऐकत नसत.

5 / 5

मिळाले अनेक सन्मान 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. 2001 मध्ये भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न दिला.2009 मध्ये फ्रान्सनेही त्यांना आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us