मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, ऐकताच थेट लावतात ठुमके, 24 वेळा दिग्दर्शकांनी केलेलं रिजेक्ट

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 31 वर्षे जुनं गाणं. जे आदित्य चोप्रा यांनी 24 वेळा केलेलं रिजेक्ट. पण आजही मुली हे गाणं ऐकू येताच थेट डान्स करू लागतात. आजही प्रचंड सुपरहिट आहे गाणं.

| Updated on: Jul 11, 2026 | 12:57 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक असलेले 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील 'मेरे ख्वाबों में जो आए' हे गाणे अंतिम होण्यापूर्वी तब्बल 24 वेळा बदलण्यात आले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक असलेले 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील 'मेरे ख्वाबों में जो आए' हे गाणे अंतिम होण्यापूर्वी तब्बल 24 वेळा बदलण्यात आले होते.

2 / 5

दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांना गाण्यातील एका ओळीबाबत समाधान होत नव्हते. त्यामुळे त्यांनी गीतकार आनंद बक्षी यांच्याकडून वारंवार गाण्याचे बोल बदलून घेतले.

3 / 5

आदित्य चोप्रा यांची इच्छा होती की, चित्रपटातील सिमरन या पात्राच्या स्वभावाशी गाण्यातील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक ओळ अगदी अचूक जुळली पाहिजे. त्यामुळे त्यांनी कोणतीही तडजोड न करता गाण्याच्या शब्दांमध्ये अनेकदा बदल सुचवले. अखेर 24व्या प्रयत्नानंतर गाण्याचे बोल त्यांना पसंत पडले आणि त्यानंतरच गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले.

4 / 5

यानंतर लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजात हे गाणे गायले. त्यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच जादू लाभली आणि 1995 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे प्रचंड गाजले. काहीच दिवसांत ते 90 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले.

5 / 5

आजही 'मेरे ख्वाबों में जो आए' हे गाणे सर्व वयोगटातील संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरते. आनंद बक्षी यांचे अर्थपूर्ण गीतलेखन, लता मंगेशकर यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि आदित्य चोप्रा यांची मेहनत यामुळे हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर क्लासिक म्हणून ओळखले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us