
आजच्या काळात प्रत्येक जण स्वच्छतेकडे विशेष लक्ष देतात. हातांच्या स्वच्छतेपासून तोंडाच्या स्वच्छतेबद्दल आपण काळजी घेत असतो. आजच्या काळात डॉक्टर देखील लोकांना दिवसातून दोनदा दात घासण्याचा सल्ला देतात. पण, चीनचे नेते माओ दात न घासण्यासाठी प्रसिद्ध होते.

माओ त्से तुंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1893 रोजी चीनच्या हुनान येथे झाला आहे. अनेक क्रांतिकारी कार्यात तेसहभागी झाले आणि कम्युनिस्ट विचारसरणी स्वीकारली.

माओ यांनी 1949 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन केले. त्यांनी 1976 पर्यंत चीनचं नेतृत्व केलं. त्यांची विचारसरणी माओवाद म्हणून ओळखली जात होती. आजही त्यांच्या कार्य कोणी विसरू शकलेलं नाही.

'द प्रायव्हेट लाइफ ऑफ चेयरमेन माओ' मध्या सांगितल्यानुसार, माओ यांनी कधीच स्वतःचे दात घासले नाहीत. माओ दररोज सकाळी उठून चहाने दात स्वच्छ करायचे. एक काळ असा होता की त्यांचे दात हिरवे दिसू लागले.

एकदा डॉक्टरांना माओ यांना दात घासण्याचा सल्ला दिला. तेव्हा माओ म्हणाले, 'सिंह कधीच स्वतःचे दात घासत नाही. तरी सुद्धा त्याचे दात स्वच्छ आणि चमकदार का असतात?'

मिळालेल्या माहितीनुसार, जीवनाच्या शेवटच्या दिवसांत माओ यांचे दात हिरवे झाले होते. माओ यांचं निधन बिजिंगमध्ये 9 सप्टेंबर1976 मध्ये झालं होतं.