
आपल्या विनोदी व्यक्तीमत्वानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

आता श्रेयानं मस्त हटके अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या साडीमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. सोबतच तिनं या साडीवर काळ्या रंगाची ज्वेलरी कॅऱी केली आहे.

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातून देशभरातील रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडेचे लाखों चाहते आहेत.

काही दिवसांपूर्वीच श्रेयानं 'बायकोला हवं तरी काय' या वेब सिरीजमधून वेब सिरीजच्या जगात पाऊल टाकलं आहे.