लक्ष्मी, अहिल्या अन् पद्मावती यांचं मंगळागौर रणांगण; निर्मिती सावंत यांची खास एण्ट्री

लक्ष्मी आणि अहिल्या ही मंगळागौरची स्पर्धा जिंकतील की? पद्मावतीचा गैरसमज दूर होईल की ? की या स्पर्धेतून अजून मोठा वाद निर्माण होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 'पारू' आणि 'लक्ष्मी निवास' यांच्या महासंगम एपिसोडमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

| Updated on: Jul 29, 2025 | 12:41 PM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ यांचा महासंगम होणार आहे. हा महासंगम मालिकेला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. जिथे जुन्या कॉलेजच्या आठवणी, गैरसमज, मैत्री आणि मंगळागौर स्पर्धा.. हे सर्व पहायला मिळणार आहे.

2 / 5
या महासंगमात अभिनेत्री निर्मिती सावंत यांची एण्ट्री होणार आहे. पद्मावती घोरपडेच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. या निमित्ताने लक्ष्मी आणि अहिल्या यांच्या कॉलेजमधील जुन्या मैत्रिणीची ही पुनर्भेट होणार आहे. मात्र ही मैत्री आनंदाने नाही तर गैरसमजाने भरलेली आहे.

3 / 5
कॉलेजमध्ये लक्ष्मी आणि अहिल्याने आपली थट्टा केली होती याचा राग पद्मावतीच्या मनात आजही आहे. त्यामुळे हीच संधी साधून त्या दोघींना ती मंगळागौरीच्या स्पर्धेचं चॅलेंज देणार आहे. लक्ष्मी आणि अहिल्या सुरुवातीला काही उत्तर देत नाहीत. पण जेव्हा पद्मावती लक्ष्मीचं भाड्याचं घर विकत घेऊन तिला बाहेर काढायची धमकी देते, तेव्हा दोघी तिचं आव्हान स्वीकारतात.

4 / 5
या स्पर्धेसाठी अहिल्या खास टीम तयार करणार आहे. जी त्यांना स्पर्धेत जिंकण्यास मदत करेल. पण या टीमचं एक गुपित आहे. हीच टीम पद्मावतीने आधीच विकत घेतलेली आहे. हा धक्कादायक ट्विस्ट या महासंगम भागात मोठा संघर्ष निर्माण करणार आहे.

5 / 5
लक्ष्मी आणि अहिल्याच्या पाठीशी त्यांच  संपूर्ण कुटुंबं उभ आहे. तर घरच्या सर्व स्त्रिया घराचं अस्तित्व आणि स्वाभिमान यासाठी  एकत्र येऊन लढणार आहेत.