
झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' या लोकप्रिय मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गोव्यात सुरू असणाऱ्या या विशेष ट्रॅकमध्ये एकीकडे भावना आणि सिद्धू एकमेकांच्या अधिक जवळ येताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे जयंत आणि जान्हवी यांचं नातं एका अनपेक्षित वळणावर येणार आहे.

भावना आणि सिद्धूला हनिमूनसाठी गोव्याला पाठवण्याचा निर्णय संपतराव घेतात. सिद्धू आपल्या प्रेमाची कबुली द्यायची संधी म्हणून या प्रवासाकडे पाहतो आणि आपले खास मित्रमैत्रीण लक्ष्मी-श्रीनिवासलाही यायचा आग्रह करतो. ते होकार देताच, भावना-सिद्धू, लक्ष्मी- श्रीनिवास गोव्यात पोहोचलेत .

तर दुसरीकडे जयंत जान्हवीला फिरायला घेऊन जाणार आहे आणि ते ठिकाणसुद्धा गोवाच आहे, या तिन्ही जोडप्यांची गोव्यातील भेट एक नवा ड्रामा तयार करणार आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर आणि आनंदी वातावरणात भावना आपल्या मनातील प्रेम सिद्धूसमोर व्यक्त करणार आहे.

सिद्धू या क्षणाने भारावून जाऊन दोघांच नातं एका नव्या वळणावर पोहोचणार आहे. दुसरीकडे जयंतच्या वागणुकीमुळे जान्हवी अस्वस्थ आहे. ती परत जाण्याचा हट्ट धरते. त्यातच जयंतला कळतं की लक्ष्मी- श्रीनिवास देखील तिथेच आहेत. जान्हवी आणि त्यांची भेट होऊ नये म्हणून त्याची धडपड सुरू होते.

जयंतने आजीला मारण्याचा प्रयत्न केला होता ही गोष्ट जान्हवीला कळणार आहे. हा धक्का तिच्या मनाला हादरवून टाकतो. तिच्या मनातील प्रेम, विश्वास आणि राग यांचा स्फोट होतो. क्रूजवर या सगळ्याचा शेवट एका जबरदस्त वळणावर होणार आहे.