
सापाचे नाव जरी घेतले तरी वेगाने सरपटणारा, फणा काढून बसलेला, पटकनू नजरेसमोरून गायब होणारा असे आपल्या डोळ्यांसमोर येते. पण तुम्हाला माहिती आहे का काही साप असेही असतात जे अत्यंत आळशी असतात. त्यांना आराम करायला खूप आवडतं. एवढंच नव्हे, तर त्यांना त्यांच्या भक्ष्यासाठी तासंतास वाट पाहावी लागते. पण या सापाने दंश केला तर तडफडून मृत्यू होतो.

Snakeसापांचा स्वभाव त्यांच्या शारीरिक रचनेनुसार, शिकार करण्याच्या रणनीतीनुसार आणि निवासस्थानानुसार असतो. काही साप सामान्यतः मोठे आणि वजनाने जड असतात. त्यामुळे ते वेगाने हालचाल करु शकत नाहीत. त्यामुळे अशा सापांना आळशी साप म्हटले जाते. या प्रकारामध्ये कोणते साप येतात? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

बोआ कंस्ट्रिक्टर: हे साप मोठे आणि जड असतात. ते सामान्यतः झाडांवर किंवा जमिनीवर आराम करताना दिसतात. शिकार करण्यासाठी ते अचानक हल्ला करतात आणि शिकाराला गुंडाळून त्याचा श्वास कोंडतात. जेणे करुन त्याचा मृत्यू होईल

अजगर: अजगर हे जगातील सर्वात मोठ्या आणि जड सापांपैकी एक आहेत. ते बहुतेक वेळ पाण्यात किंवा त्याच्या जवळ आराम करताना आढळतात. ते खूप कमी सक्रिय असतात आणि शिकार पकडण्यासाठी अचानक हल्ला करतात. दलदल, नद्या, जलाशयांमध्ये ते अढळून येतात.

पायथन: हे मोठे आणि जड साप असतात. बहुतेक वेळ सुस्त अवस्थेत राहतात आणि शिकार पकडण्यासाठी अचानक हल्ला करतात. हे जंगल, दलदल आणि दाट जंगलात आढळतात.

गबून व्हायपर: गबून व्हायपर त्यांच्या जड शरीर आणि सुस्त स्वभावासाठी ओळखले जातात. हा साप जमिनीवर किंवा झाडाच्या पानांमध्ये आराम करताना आढळतो. शिकार पकडण्यासाठी घातक हल्ला करतात.