
आवळा गेल्या अनेक वर्षांपासून औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. आवळा आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्याचा वापर करून आपण केसांच्या अनेक समस्या दूर ठेऊ शकतो. आवळा हे व्हिटॅमिन सीचे चांगले स्त्रोत आहे. आवळ्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केस मजबूत आणि सुंदर बनवण्याचे काम करतात. यामुळे आवळ्याचे हेअर पॅक केसांना लावणे फायदेशीर आहे.

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी 2 ताजे आवळे घ्या. त्यानंतर त्या आवळ्यांची बारीक पेस्ट तयार करा. त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावा. साधारण अर्धा तास ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. मग कोमट पाण्याने आपले केस धुवा.

केस गळणे सहसा लोहाच्या कमतरतेमुळे होते. केसगळती टाळण्यासाठी तुमच्या केसांना लोहाची गरज असते. आवळा तुम्हाला आवश्यक लोह पुरवतो. आवळ्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी दोन्ही मुबलक प्रमाणात असते जे केस गळती रोखण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आवळा तुमच्या केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी ओळखला जातो. आवळा तुमच्या केसांच्या कूपांना मजबूत करतो. ज्यामुळे केसांची वाढ होण्यासही मदत होते. हे केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते आणि तुमचे केस मऊ आणि मजबूत बनवते.