
हिमाचल हे भारतातील अशा पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जिथे निसर्गाचे मोठे साैंदर्य आपल्याला बघायला मिळते. तसेच हे राज्य त्याच्या स्वादिष्ट चवीसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथे मिळणाऱ्या या चविष्ट पदार्थांबद्दल जाणून घ्या आणि आणि नक्कीच टेस्ट देखील करा.

हिमाचलचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ असलेल्या शिमलामध्ये बबरु हा खास खाद्यपदार्थ तुम्हाला सहज मिळेल. हे उत्तर भारतातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ आहे. जे चिंचेच्या चटणीबरोबर दिला जातो.

छा गोश्त कुल्लूसह हिमाचलच्या अनेक भागात मिळणाऱ्या खास मांसाहरी पदार्थ आहे. या डिशची चव खूपच अप्रतिम आहे. मटण करीप्रमाणे बनवलेली ही डिश हिमाचलचे प्रसिद्ध खाद्य मानले जाते.

चना मद्रा हे देखील हिमाचलचे एक लोकप्रिय खाद्य आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक मसाल्यांची चव मिळेल. हिमाचलच्या चंबा प्रदेशात, लोक केवळ रेस्टॉरंटमध्येच नव्हे तर घरी देखील मोठ्या आवडीने बनवतात.

कुल्लूचा ट्राउट फिश हिमाचलच्या सहलीदरम्यान, मांसाहार प्रेमी कुलूच्या ट्राउट माशाचा आस्वाद घेऊ शकतात. कमी मसाल्यात बनवलेले असूनही त्याची चव खूप चांगली आहे आणि लोकांना ती उकडलेल्या भाज्यांसोबत खायला आवडते.