
वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम पेय मानला जातो. आपल्यालाही आपले वाढते वजन नियंत्रित करायचे असेल, तर रात्री झोपेच्या आधी कॅमोमाइल चहा पिणे विसरू नका. असे केल्याने केवळ तुमचे वजनच नियंत्रित होणार नाही, तर तुम्हाला झोपही चांगली मिळेल.

कॅमोमाइल चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते मासिक पाळी दरम्यानच्या वेदना कमी करण्याचे काम करतात. एका अभ्यासानुसार, कॅमोमाइल चहाचे सेवन मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते.

काही अभ्यासानुसार, कॅमोमाइल चहा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर कमी करू शकते. 2008 च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कॅमोमाइल चहाचे वारंवार सेवन केल्याने रक्तातील साखर वाढण्यापासून रोखता येते.

कॅमोमाइल चहा हाडांसाठी फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार, कॅमोमाइल चहामध्ये एस्ट्रोजेनिक विरोधी प्रभाव असू असतो. यामुळे हाडांची घनता वाढवण्यास मदत होते.