
अनेक लोकांना प्रवास करायला आवडतो. त्यांना देशाच्या विविध भागात फिरायला आवडते. जर तुम्हाला दक्षिणेतील सुंदर नजारे पहायचे असतील तर एकदा तामिळनाडूचा प्लॅन करा. आज आम्ही तुम्हाला तुम्हाला तामिळनाडूमधील काही सुंदर ठिकाणे सांगणार आहोत.

3500 फूट उंचीवर वालपराई हे ठिकाण तामिळनाडू राज्यातील जंगलांनी वेढलेले ठिकाण आहे. रोड ट्रिपसाठी हे खूप खास ठिकाण आहे.

तुम्ही दाट जंगलात आणि चांगल्या हवामानात सिरूमलाईचा आनंद घेऊ शकता. हे समुद्रसपाटीपासून 1600 मीटर उंचीवर वसलेले आहे.

पोलाची हे एक अप्रतिम ऑफबीट ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील सुंदर नजारा पाहण्यासाठी तुम्ही एकदा नक्की भेट द्या.

जवाधु हिल्सच्या सौंदर्याबद्दल जेवढे बोलले जाईल तेवढे कमीच आहे. ही टेकडी दोन भागात विभागली आहे, एक चेयार नदीने आणि दुसरा आगराम नदीने.