
काळ्या वर्तुळांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हळद आणि दह्याचे मास्क बनवू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी चिमूटभर हळद पुरेशा प्रमाणात दह्यामध्ये मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या डोळ्यांजवळ लावा. त्यानंतर कोमट पाण्याने डोळे धुवा.

एक चमचा कोरफड जेलमध्ये एक चमचा दही, एक चमचा बेसन आणि एक चमचा मध मिसळा आणि आठवड्यातून किमान 2 दिवस फेसपॅक म्हणून लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

त्वचेला टॅनिंग करण्यासाठी दही खूप उपयुक्त आहे. चेहरा, मान, हात, पाय आणि मानेवर सूर्यप्रकाश पडतो. दही टॅन कमी करण्यास मदत करते. यामुळे त्वचेवरील टॅन कमी होतो.

एक चमचा कोरफडमध्ये गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा दह्यात एक चमचा मध मिसळून त्वचेवर लावा. थोडा वेळ ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल.(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)