तुम्ही बडीशेप खाता का? त्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

जेवण झालं की अनेकांना लगेच बडीशेप खाण्याची सवय असते. पण अनेकांना कशासाठी खातो तेच माहिती नसते. हॉटेलमध्येही जेवण झालं की बिल भरताना बडीशेप खाऊन घेतो. पण त्याचे फायदे काय आहेत ते समजून घ्या.

| Updated on: Aug 20, 2025 | 10:09 PM
1 / 5
बडीशेप ही आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे त्याला सुपरफूड संबोधलं गेलं आहे. अनेकांना बडीशेप खायला आवडते. काही लोकं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी त्याचं पाणी पितात. (Photo- Freepik)

2 / 5
बडीशेप पचन क्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करते. वजन कमी करण्यास देखील बडीशेप फायदेशीर आहे. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचं काम करते , असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. तसेच पोटफुगी आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम देते. (Photo- Freepik)

3 / 5
बडीशेपचे पाणी पिणे देखील फायदेशीर आहे. बडीशेपच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. बडीशेपचे बिया रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे पाणी पिल्याने पचनसंस्था सुधारते. वजन कमी करण्यास देखील मदत होते. (Photo- Freepik)

4 / 5
काही संशोधनातून असा निष्कर्ष निघाला आहे की, बडीशेपचे पाणी पिल्याने मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. हे सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. यामुळे तोंडाची दुर्गंधी देखील दूर होते. (Photo- Freepik)

5 / 5
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर बडीशेप चावल्याने पचन सुधारते, तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि गॅस आणि पोटफुगीपासून आराम मिळतो. दुसरीकडे, बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उकळल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पोटाच्या समस्या देखील दूर करते. (Photo- Freepik)