
चांगले जाड आणि लांबसडक केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. दोन व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, दोन चमचे कोरफड जेल, एक चमचे मोहरीचे तेल, एक ते दीड कप पाणी हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांसाठी लावा. यानंतर पाण्याने शॅम्पू लावून केस धुवा. हा हेअर मास्क साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा.

केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथी दाणे शिजवू ठेवा. त्यानंतर सकाळी उठून मेथी दाणे आणि तेल वेगळे करा आणि त्या तेलाने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावावे. एका महिन्यात तुम्हाला फरक दिसेल.

तिळाचे तेल हलके गरम करून, मग या तेलाने हलक्या हाताने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा. काही वेळ हे तेल केसांमध्ये असंच राहू द्या आणि मग सध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल.

सुध्द तूप तीन चमचे, दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा खोबरेल तेल मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि ही संपूर्ण पेस्ट आपल्या केसांना लावा. त्यानंतर साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. बरेच लोक नियमितपणे तेल केसांना लावत नाहीत. कोरडे आणि निर्जीव केस होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. तेल लावल्याने आपल्या केसांना आणि टाळूला पोषण मिळते. केस निरोगी राहण्यासाठी आपण नियमितपणे मालिश केली पाहिजे.