
चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

हिवाळ्यात ओठ फुटण्याची समस्या निर्माण होते. ओठांची काळजी घेण्यासाठी लिप बाम हा सर्वात सोपा उपाय आहे. हे तुमचे ओठ हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

हिवाळ्यात केवळ चेहऱ्याचीच नाही तर शरीराचीही काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी बॉडी बटर क्रीम वापरली पाहिजे.

तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये कोणतेही क्लीन्सर वापरा. कारण यामुळे आपली त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटते की, हिवाळ्याच्या हंगामामध्ये सनस्क्रीन लावण्याची काही गरज नाही. मात्र, हिवाळ्याच्या हंगामामध्ये निरोगी त्वचा ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावली पाहिजे.