
जेवल्यानंतर काही जणांना शौचाला जाण्याची एक सवय जडलेली असते. पण असं कधीतरी घडलं तर ठीक आहे. पण वारंवार असं होत असेल तर सावध व्हा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. असं रोज होत असेल तर त्याला गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्स असं समजलं जातं. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. डॉक्टरांच्या मते, असं होत असल्यास पचन होत नसल्याची लक्षण आहे.

तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा शौचास जाता का? शौचाला जाण्याचं प्रमाण अधिक असल्यास तुमच्या आतड्यांमध्ये काहीतरी बदल झाला असावा. वारंवार शौचास होण्याचे एकमेव कारण अतिसार किंवा बद्धकोष्ठता नाही. हे इतर समस्यांमुळे देखील होऊ शकते.

दिवसातून एक ते तीन वेळा शौचास जाणे सामान्य आहे. पचनाचा वेग देखील प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असतो. आतड्यांचे आरोग्य, क्रियाकलाप पातळी, खाण्याच्या सवयी, ताणतणाव, औषधे आणि ओव्हर-द-काउंटर पूरक आहार यासारख्या घटकांमुळे असं होऊ शकते. जर ही समस्या पुन्हा उद्भवली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तज्ञांच्या मते, गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्स प्रौढांवर परिणाम करते, ज्यामुळे पोटात वेदना आणि तीव्र अतिसार अशी लक्षणे उद्भवतात. या लोकांसाठी, अन्न पोटात जाताच, तुमचे शरीर काही विशिष्ट हार्मोन्स सोडते. म्हणूनच ही लक्षणे दिसतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
