
काळे मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. या मनुकामध्ये भरपूर पोषक असतात, त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडेंट फायटोन्यूट्रिएंट्स, पॉलीफेनॉल आणि आहारातील फायबर असतात. यामुळेच काळे मनुके खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, खाण्याचा अतिरेक नकोच.

काळ्या मनुक्यामध्ये प्रथिन्यांचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. काळ्या मनुक्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. विशेष म्हणजे हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते.

काळ्या मनुकामध्ये भरपूर लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात. काळ्या मनुकामध्ये असलेले लोह लाल रक्त पेशींना प्रोत्साहन देते. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये काळ्या मनुक्याचा समावेश करा.

काळे मनुके डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. काळ्या मनुकामध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट्स, पॉलिफेनॉल्स आणि फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि इतर अँटीऑक्सिडंट्स आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.

काळ्या मनुकामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम देखील भरपूर असतात, ते केस आणि टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेष म्हणजे काळे मनुके भिजून खाल्ल्याने आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.