
मध, साखर आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि त्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण नको असलेल्या केसांवर लावा. वीस मिनिटी ही पेस्ट केसांवर ठेवा आणि मसाज करा आणि हळूहळू केस काढण्याचा प्रयत्न करा.

बाजरीचे पीठ आणि लिंबू मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांना लावा. त्यानंतर हळूहळू काढण्याचा प्रयत्न करा.

हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामध्ये हळद आणि दूध मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. त्यानंतर चेहऱ्याच्या मसाज करत हळूहळू काढण्याचा प्रयत्न करा.

चमचाभर मेथीच्या दाण्यांमध्ये दोन चमचे पाणी मिक्स करा आणि काही वेळ भिजत ठेवा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे नको असलेले केस जाण्यास मदत होते.

मक्क्याच्या पिठामध्ये साखर आणि एक अंड मिक्स करा. त्याची पेस्ट बनवून चेहरा किंवा हातावर लावा. सुकल्यानंतर ही पेस्ट मसाज करत काढा. यामुळे नको असलेले केस निघून जाण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)