
भाऊचा धक्का मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक मासे प्रेमी मासे खरेदी करण्यासाठी येतात. भाऊचा धक्का या बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मासे खरेदी करता येतात.

ससून डॉक : सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे... ससून डॉकमध्ये अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात..

क्रॉफर्ड फिश मार्केट प्रचंड जुनं आणि प्रसिद्ध फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक प्रकारचे मासे मिळतात. एवढंच नाही तर, क्रॉफर्ड फिश मार्केटमध्ये माशांचे दर देखील परवडणारे असतात.

सायन फिश मार्केट : सायन मार्केट मुंबईतील एक मासळी मार्केट ज्यामध्ये खेकडे देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही येथे कमी प्रमाणात मासे देखील खरेदी करू शकता.

दादर फिश मार्केट : मार्केट स्टेशनच्या अगदी जवळ आहे. दादर स्टेशनजवळ मोठं मार्केट आहे. याठिकाणी फळं, भाज्या आणि फिश मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे परवडणाऱ्या दरात असतात.