
खोबरेल तेल नियमित लावल्याने सन टॅनची समस्या दूर होते. खोबरेल तेलामध्ये इतरही घटक मिक्स करून आपण घरच्या घरी सन टॅन पॅक तयार करू शकतो.

लिंबाच्या रसामध्ये ब्लीचिंग असते जे सन टॅन दूर करण्यासाठी प्रभावी आहे. त्यात व्हिटॅमिन सी देखील असते, जे त्वचेचे पोषण करते.

त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेल आणि मध यांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी दोन चमचे खोबरेल तेल घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटांनी पाण्याने धुवा.

खोबरेल तेल आणि बेकिंग सोडा यांची पेस्ट देखील टॅन दूर करण्यासाठी प्रभावी आहे. या दोघांनी तयार केलेली पेस्ट त्वचेवर लावा आणि पाच मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. असे दोन ते तीन वेळा केल्यास त्वचेत फरक दिसेल.

पारंपारिक आयुर्वेदीक उपचार पध्दतींमध्ये त्वचेच्या समस्यांबाबत अनेक घरगुती उपाय करता येतात.