
चहा पिण्याचे शौकीन असलेले लोक उन्हाळ्यातही चहा पिणे सोडत नाहीत. जे चहाचे शौकीन आहे, त्यांना प्रत्येक ऋतूत चहा प्यायला आवडतो. अनेकदा तज्ज्ञ म्हणतात की चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे.

चहामध्ये कॅफिन असते. जे शरीरात जाऊन आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण करते. उष्ण वातावरणात चहा पिणे टाळले पाहिजे. मात्र, आपण चहा तयार करताना काही बदल केले तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हिवाळ्यात अनेकदा सर्दी होते. शरीरात जळजळ वाढल्याने सर्दी होते. अशा स्थितीत हे टाळण्यासाठी चहा बनवल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे.

चहा प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. हे ऐकून विचित्र वाटेल. होय, या समस्येवर मात करण्यासाठी चहामध्ये बटर मिसळून प्या. लोणी पचनसंस्थेला वंगण घालते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

मासिक पाळीच्या काळात पोटात जास्त दुखत असेल तर चहा प्यायल्याने या दुखण्यापासून आराम मिळतो. पोटातील दुखणे टाळण्यासाठी आपण चहामध्ये बडीशेप मिक्स करून पिली पाहिजे.