
अप्रामाणिक किंवा अविश्वासू लोकांशी चुकूनही मैत्री करू नये. कोणतंही नातं हे विश्वासावर टिकतं. अविश्वासू लोकांच्या संगतीमुळे विश्वासघआत किंवा दगाफटका होऊ शकतो. अशा लोकांपासून कायम अंतर ठेवावे.

जे मित्र वैयक्तिक फायद्यासाठी हुजरेगिरी करतात. अशा लोकांशी मैत्री करू नये असं चाणक्य नीतीत सांगण्यात आलं आहे. अशा व्यक्ती स्वतःच्या हितासाठी आपला वापर करू शकतात.

ज्या व्यक्ती सतत आपल्यात फूट कशी पडेल, वाईट व्हावं यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच मतभेदाचे बीज पेरतात. अशा लोकांपासून दोन हात दूर राहिलेलच बरं राहील.

जे मित्र वाईट काळात तुमची साथ देत नाहीत, त्यांना दूरच ठेवा. सुखात सर्वजण एकत्र राहतात पण दु:खाच्या वेळी साथ देणारा खरा मित्र असतो.

चाणक्य नीतीत मैत्री करताना काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. ही मार्गदर्शक तत्त्व लक्षात ठेवल्यास पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.