
बद्धकोष्ठता: शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, लोकांना अनेकदा बद्धकोष्ठता सारखी गंभीर समस्या उद्भवते. यावर योग्यवेळी उपचार न केल्यास ते मूळव्याधासारखा आजाराही होऊ शकतो.

लघवीला जळजळ होणे : जर तुम्ही पाणी कमी प्यायले तर त्यामुळे तुम्हाला लघवीमध्ये इन्फेक्शन होऊ शकते. लघवीच्या वेळी जळजळ होते.

त्वचेचे होणारे नुकसान : पाणी कमी पिल्यास त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. त्वचा निस्तेज दिसू लागते. यासोबतच पिंपल्स आणि इतर समस्याही निर्माण होऊ लागतात.

किडनीच्या समस्या: कमी पाणी पिल्याने किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मूत्रपिंड आपल्या शरीरातील खराब पदार्थ काढून टाकतात, परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

एनर्जी लेव्हल : पाण्याच्या कमतरतेमुळे शरिरातील ऊर्जा अधिक खर्च होते. त्यामुळे थकवा जाणवतो.