
दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेष: दही अल्सरचा त्रास देखील दूर करते. डॉक्टर देखील अल्सरची समस्या दूर करण्यासाठी दही खाण्याचा सल्ला देतात.

कोरफडीचा रसामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी अल्सरचा त्रास दूर करते. घरच्या-घरी ताज्या कोरफडचा रस तुम्ही घरी तयार करून पिऊ शकता.

तोंडातील अल्सरपासून सुटका हवी असेल तर लवंग बारीक करून तेलात गरम करा. तेल थंड झाल्यावर कापसाच्या साहाय्याने फोडांवर लावा. यामुळे आराम मिळेल.

औषधी गुणधर्माने भरपूर असलेली तुळशीची पाने अल्सर दूर करू शकतात. तुळशीची काही पाने धुवून काही वेळ तोंडात ठेवा आणि नंतर हळू हळू चावा.

अल्सरची समस्या दूर करण्यासाठी मोसंबी आणि संत्रीचा रस गुणकारी मानला जातो. दररोज एक ग्लास रस घेतल्याने अल्सर कमी होतात. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)