
खोबरेल तेल : यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेची काळजी घेतात. त्वचेवरील लालसरपणा, अॅलर्जी आणि जळजळ दूर करण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. रंग काढून टाकल्यानंतरही अॅलर्जी असल्यास बाधित भागावर खोबरेल तेल लावावे.

कोरफड: कोरफड जेल देखील त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रंग खेळण्याच्या अगोदर आपल्या त्वचेला कोरफड जेल लावा.

चोळू नका : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अॅलर्जी किंवा पुरळ उठत असेल तर आंघोळ करताना घासू नका. यामुळे अॅलर्जी आणखी वाढू शकते.

अंघोळ करा : होळी खेळल्यानंतर बहुतेक लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. यामुळे अॅलर्जी आणखी वाढवू शकते. गरम पाण्याऐवजी थंड किंवा साध्या पाण्याने आंघोळ करा.

क्रीम लावा: होळीच्या दिवशी रंग खेळताना अॅलर्जी होत असेल तर अँटीसेप्टिक क्रीमची मदत घ्या. आंघोळीनंतर त्वचेवर अँटीसेप्टिक क्रीम लावा.