
आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात. यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अर्थात मुरूम येतो. चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय करू शकतो.

पिंपल्स

पिंपल्स

ग्रीन टीची पिशवी गरम करा आणि थंड होऊ द्या. ग्रीन टीची पिशवी थंड झाल्यावर मुरुमावर ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा आणि रात्रभर तसेच ठेवा. ग्रीन टीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात.

चेहर्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, यासाठी आपण झोपण्याच्या अगोदर टोमॅटोचा रस आपल्या त्वचेला लावला पाहिजे. (टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)